विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

॥ श्री स्वामी समर्थ ॥

माझ्याकडे क्लासला येणा-या चौथी व सातवीच्या काही विद्यार्थ्यांच्या क्लासविषयीच्या प्रतिक्रिया त्यांच्याच हस्ताक्षरात जशाच्या तशा देत आहे. या प्रतिक्रियांमागची त्यांची भावना समजून घ्या त्यातल्या स्पेलिंगच्या चुका काढू नका. ही माझी आपणास नम्र विनंती आहे. याला कारणही तसंच आहे. पालकांच्या या असल्या अतिचिकित्सक वृत्तीमुळेच मुले आपल्याच पालकांशी संवाद साधायचा सोडून माझ्यासारख्या ति-हाईताशी संवाद साधतात. त्याची काही अगदी हेलाऊन टाकणारी उदाहरणे यात आपल्याला सापडतील.

एक मुलगी म्हणते,”I love you sir.” तर एक म्हणते, “मी तुमच्याशिवाय कशी जगू?” काय म्हणाल याला? चौथीतल्या मुलींच्या या शब्दांचे अर्थ तरी कळतात का? म्हणूनच म्हणतो, त्यांच्या शब्दांवर जाल की त्यामागच्या भावना पहाल?

जेंव्हा एखादी मुलगी म्हणते, “Don’t stop me crying.” अशावेळी तिच्या भावना महत्वाच्या की, तिने bye लिहायच्या ऐवजी by sir असे लिहिले आहे म्हणून तिला तिच्या चुका दाखवत बसणार? प्रश्न हा नाही की, मग आम्ही चुका दाखवायच्याच नाहीत का? जरुर दाखवा, पण त्या योग्य वेळी व योग्य प्रकारे दाखवा.

वर्गात प्रत्येक चाचणीत पहिला येणारा विद्यार्थी जेंव्हा म्हणतो की, मी पहिला येतो पण मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी क्लासला येतो ते झोक्यावर बसायला मिळते आणि तुमच्या रॉकीबरोबर (आमच्याकडे एक कुत्रा आहे) खेळायला मिळते म्हणून, म्हणून मी काहीच प्रतिक्रिया लिहिणार नाही. आता याला उद्धटपणा म्हणायचं की स्वत:चे म्हणणे समर्थपणे आणि न घाबरता व्यक्त करण्याचे धाडस म्हणायचे? का हा मुलगा असे म्हणाला असेल? त्याच्या पालकांना हे माहित असेल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

म्हणूनच म्हणतो पाल्याशी संवाद साधा. त्याला तुमच्याशी बोलावेसे वाटू द्या. अन्यथा, ही धोक्याची घंटा कायम मनात वाजू द्या की, ती आपल्यापासून दुरावली तर तरुण वयात ही मुले कोणाही संधीसाधू व्यक्तीच्या, उथळ प्रेम दाखविणा-या व्यक्तीच्या मागे वाहवत जातील.

खाली दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नांवावर क्लिक केल्यास त्यांच्या – त्यांच्या प्रतिक्रिया वाचता येतील.

 1. हिमानी याक्कुंडी
 2. अनुष्का काळे
 3. हिमानी आणि अनुष्का
 4. तन्वी ठाकूर
 5. क्षितिज कुलकर्णी
 6. अनिश काळे
 7. दिविजा किंगर
 8. परीमल माटे
 9. संस्कार तारे
 10. प्रज्ञा घळसासी
 11. सिद्धि जगताप
 12. नेहा भावसार
 13. अद्वैत कुलकर्णी
 14. आकांक्षा पानसरे
 15. श्रेया फडके
 16. अनुष्का फडके
 17. प्रविण गुर्जर
 18. ऋचा कुलकर्णी
 19. गौरांग मुसळे
 20. हर्षल चवरे
 21. कल्याणी कुरणे
 22. श्रुति भट
 23. आदित्य वारे
 24. ईशान कवठेकर
 25. सिमरन संघानी (ही विद्यार्थीनी कवयत्री आहे)
 26. अनिकेत गौडगोल
 27. श्रुति सेनगांवकर
 28. आर्या खैरनार
 29. चैतन्य तांबोळकर
 30. संबोधी खंडागळे
 31. अपूर्वा वाणी
 32. साक्षी खोडे
 33. मैत्रेय खंडागळे
 34. मौशमी जाजू
 35. सिद्धेश दळवी
 36. श्रुति गांधी
 37. अर्चना अय्यर
 38. आयुषी गोयल
 39. श्योण देशपांडे
 40. क्षितिज चौधरी
 41. संकर्षण जोशी
 42. श्रेया बहाळकर
 43. हृषिकेश कुलकर्णी
 44. अभिषेक राजेभोसले
 45. अनिश धोत्रे
 46. क्षितिज
 47. अनामिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *