मुखपृष्ठ

माननीय पालक,

“श्री. नितीन बगाडे संचालित, विद्यानिकेतन क्लासेस” च्या या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
दरवर्षी इयत्ता दुसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जवळ जवळ ४२ प्रकारच्या स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात. परिक्षा तर असतात पण त्यासाठी लगणारे अभ्यास-साहित्य मात्र उपलब्ध होत नाही. शहरातील विद्यार्थ्यांनाही यात अडचणी येतात, मग खेडेगावांत तर काय परिस्थिती असेल? जवळ जवळ ६०% परिक्षा इंग्रजी माध्यमात असतात. मग मराठी माध्यमाच्या मुलांनी काय करावे? त्यांना परिक्षा नसल्या तरी किमान त्यांचा अभ्यास तरी करता यावा हाही या मराठी संकेतस्थळाचा एक उद्देश आहे.
या संकेतस्थळावरुन आमच्याकडे नोंदणी केलेल्या अधिकृत विद्यार्थ्यांच्या जून ते जानेवारी अखेरपर्यंत दरमहा विषयवार चाचण्या घेतल्या जातील या चाचण्यांचे वेळापत्रक व विषयवार अभ्यासासाठी आवश्यक ते साहित्य छापील व दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध असेल. या संकेतस्थळावरुन अधिकत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना घटकवार प्रश्नपत्रिका दिल्या जातील. या प्रश्नपत्रिकांची आवश्यकतेनुसार युक्त्या व स्पष्टिकरणासह उत्तरेही उपलब्ध करुन दिली जातील. पण यातील कोणतेही साहित्य विद्यार्थ्याला प्रिंट करता येणार नाही. (असे प्रिंटिंग करणे हा कायदेशीर गुन्हा असेल कारण आमच्याकडे त्याचा कॉपीराईट आहे.)
या संकेतस्थळावर लवकरच ऑनलाईन परीक्षा घेण्याचाही आमचा मानस आहे. तसा आमचा प्रयत्नही सुरु आहे. हे संकेतस्थळ, क्लासेसचा व्याप सांभाळून, मी स्वत: एकटा हाताळत असल्याने याला कदाचित वेळ लागू शकतो. या ऑनलाईन परीक्षांचे स्वरुप – – –
चाचणी सोडवून झाल्यावर लगेचच विद्यार्थ्याला स्वत:चा निकाल पहाता येईल. हा निकाल प्रत्येक प्रश्नाला किती वेळ लागला? त्याचे या संकेतस्थळावर अधिकृत नोंदणी केलेल्या त्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत असणारे स्थान व त्याने सोडविलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्टिकरणासह उत्तरे अशा स्वरुपात उपलब्ध असेल हा निकाल त्याला त्याच्या संगणकावर कॉपी करता येईल.
स्पर्धा परिक्षांना बसू एच्छिणा-या सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपणास यावर्षी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परिक्षांच्या विद्यार्थ्यांना (इयत्ता दुसरी पासून नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी टप्या-टप्याने यात भर घातली जाईल.) आवश्यक असणारे स्पर्धा परिक्षांचे आमच्याकडील शैक्षणिक साहित्य (छापील, श्राव्य व दृकश्राव्य माध्यमातील) तर उपलब्ध असेलच परंतु स्पर्धा परिक्षांचा अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना कोणत्या युक्त्या वापराव्यात. याचे अत्यंत उत्कृष्ठ मार्गदर्शन करणा-या दृक्श्राव्य फिती उपलब्ध असतील.